दुहेरी कर उद्योगांवर अन्यायकारक ः जामदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुहेरी कर उद्योगांवर अन्यायकारक ः जामदार
दुहेरी कर उद्योगांवर अन्यायकारक ः जामदार

दुहेरी कर उद्योगांवर अन्यायकारक ः जामदार

sakal_logo
By

बारामती, ता. १५ ः येथील एमआयडीसीमधील भूखंडधारक लघुउद्योजकांकडून रस्ते, पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी सेवाकर व अग्निशमन सुविधांसाठी फायरसेसच्या रूपात एमआयडीसी प्रशासन दरमहा नियमित स्वरूपात कर संकलन करत असते. या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीनेदेखील प्रचंड रकमेची घरपट्टी बिलाची मागणी उद्योजकांना केली आहे. उद्योजकांचा ग्रामपंचायतींना कर देण्यास विरोध नाही, परंतु दुहेरी कर आकारणी हा लघुउद्योजकांवर अन्यायकारक असून, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे दाद मागू, असे बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.


बारामती औद्योगिक क्षेत्रातील अनेक लघुउद्योगांना ग्रामपंचायतीकडून प्रचंड रकमेच्या घरपट्टी बिलाची मागणी नुकतीच करण्यात आली असून, या अन्यायाविरोधात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नीलेश मोडवे यांना निवेदन देण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

असोसिएशनचे सचिव अनंत अवचट, सदस्य अंबीरशाह शेख, मनोहर गावडे, संभाजी माने, हरीश कुंभरकर टेक्स्टाईल पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी महंमद संकेश्वरकर, चंद्रकांत नलवडे, कृष्णा ताटे, रमाकांत पाडुळे, रमेश पटेल, विष्णू दाभाडे, अप्पासाहेब जाधव, अविनाश पाटणकर, आशिष पल्लोड, राजन नायर, केतन भोंगळे, अनिल वाघ आदींसह अन्य उद्योजक यावेळी उपस्थित होते.

बारामती एमआयडीसी ही तांदूळवाडी, रुई, गोजबावी, वंजारवाडी व कटफळ या पाच ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट आहे. यापैकी तांदूळवाडी व रुई ग्रामपंचायत बारामती नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्याने बरखास्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रातील एमआयडीसीतील भूखंडधारकांना घरपट्टी लागू नाही. गोजुबावी हद्दीत फक्त विमानतळ आहे. उर्वरित केवळ वंजारवाडी व कटफळ ग्रामपंचायती कर आकारू शकतात. एकाच औद्योगिक क्षेत्रात भूखंडधारकांना एकसमान कर आकारणी होणे अपेक्षित आहे, परंतु बारामती औद्योगिक क्षेत्रात याबाबत समन्वय नाही, असे जामदार यांनी सांगितले.
तहसीलदार, गटविकास अधिकारी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता, संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्या समवेत उद्योजकांची बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, असे या बैठकीत ठरवण्यात आले.

------------------
राज्यातील विविध क्षेत्राचे औद्योगिक प्रगतीचा आलेख पाहून राज्याच्या उद्योग विभागाने ए, बी, सी, डी व डी प्लस असे वर्गीकरण केले आहे. त्याचा आधार घेऊन राज्य सरकारने त्या-त्या विभागातील ग्रामपंचायतकराचा दर ठरवावा. - धनंजय जामदार, अध्यक्ष, बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10984 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..