खुर्ची वाचविण्यासाठी राज्य पणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुर्ची वाचविण्यासाठी राज्य पणाला
खुर्ची वाचविण्यासाठी राज्य पणाला

खुर्ची वाचविण्यासाठी राज्य पणाला

sakal_logo
By

बारामती, ता. १७ : ‘‘मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे आपली खुर्ची वाचवण्यासाठी राज्य पणाला लावत आहेत, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने एक षडयंत्र कुठून तरी होत आहे,’’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामतीत माध्यमांची बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, ‘‘राज्य सरकार अस्तित्वात येऊन अडीच महिन्यांचा कालावधी गेला, तरी अनेक मंत्र्यांनी अद्यापही आपल्या खात्यांचा कार्यभार स्वीकारला नाही. त्यांनी ५० खोके घेतले आहेत. त्यामुळे त्यांना कामच करायचे नाही. जे कार्यक्रमातच व्यग्र असतात, त्यांना राज्याचे काही देणेघेणे नाही. अनेक जिल्ह्यांना पालकमंत्रीच मिळालेले नाहीत. अशा सरकारबद्दल काय बोलायचे? मंत्री कार्यभार स्वीकारत नसल्याने महाराष्ट्रातील कामकाज केले अडीच महिने ठप्प आहे. जिल्हा नियोजन समितीतील हक्काचे पैसे देखील खर्च होत नाहीत. महाराष्ट्रातील विकासाचे काम यामुळे संपूर्णपणे ठप्प झाले आहे. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री पितृपंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर पदभार स्वीकारत नाही, ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे.’’
पहिली ते चौथीपर्यंतच्या अभ्यासक्रमाच्या बदलाबाबत विचार सुरु असल्याबाबत विचारले असता, ‘‘आपण याबाबत शिक्षणमंत्र्यांची वेळ मागितली आहे आणि याबाबत राज्य सरकारने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10994 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..