महिलांबाबतच्या गुन्ह्यांसाठी कडक धोरण : महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांबाबतच्या गुन्ह्यांसाठी कडक धोरण : महाडिक
महिलांबाबतच्या गुन्ह्यांसाठी कडक धोरण : महाडिक

महिलांबाबतच्या गुन्ह्यांसाठी कडक धोरण : महाडिक

sakal_logo
By

बारामती, ता. १८ : अल्पवयीन अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीला तिच्या संमतीने घेऊन जाणे हा सुद्धा गुन्हा आहे. महिलांबाबतच्या गुन्ह्यात बारामती शहर पोलिसांनी कडक कारवाईस प्रारंभ केल्याची माहिती पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी दिली. अल्पवयीन मुलींना फुस लावून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जर त्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय घेऊन गेला तर या गुन्ह्याला पोस्को कलम लागते. यापुढे पोलिसांतर्फे अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई होणार आहे. तीन विविध घटनात पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. यैात एका होमगार्डचाही समावेश आहे.

आरोपी आदित्य धनाजी गायकवाड (वय २०, रा. पानसरे अपार्टमेंट कृष्णाई लॉन्स, बारामती) याने १४ डिसेंबर २१ रोजी बारामतीतीलच अल्पवयीन मुलीला पळून नेले होते. त्या दोघांचाही काहीही सुगावा त्या दिवसापासून लागत नव्हता. तांत्रिक गोष्टींचे विश्लेषण करून सुद्धा त्यांचा ठावठिकाणा मिळत नव्हता. त्याची माहिती काढून सदर आरोपीला पुणे शहरातून पोलिसांनी अटक केली.

दुसऱ्या घटनेमध्ये २३ ऑगस्ट पासून स्वतःच्या नात्यातील अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याबरोबर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणारा क्षितिज उर्फ ऋतिक सुनील गरड (वय २२, रा. जेऊर, ता. करमाळा, सध्या रा. रुई पाटी, बारामती) याला सुद्धा पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली आहे. त्याच्यावर सुद्धा पोस्को व ३७६ अन्वये कारवाई केली आहे.

तिसऱ्या घटनेमध्ये होमगार्ड म्हणून काम करणारा सुजित सुनील घाडगे (वय २६, रा. गौतमनगर, बारामती) यानेही महिलेच्या ओळखीचा फायदा घेत तिला काही वर्षापासून मारहाण, दमदाटी, दुखापत करणे यासारख्या अत्याचार करून तिच्याबरोबर शरीर संबंध ठेवले म्हणून सदर आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला सुद्धा अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, मुकुंद पालवे, संध्याराणी देशमुख, पोलिस कर्मचारी अंकुश दळवी, देवेंद्र खाडे, अनिल सातपुते, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले यांनी केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10996 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..