बलात्कारप्रकरणी प्रौढास कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कारप्रकरणी प्रौढास कारावास
बलात्कारप्रकरणी प्रौढास कारावास

बलात्कारप्रकरणी प्रौढास कारावास

sakal_logo
By

बारामती, ता. १ : अल्पवयीन मुलीवर धमकी देत बलात्कार करणाऱ्या हनुमंत बापू शिंदे (वय ५४) यास येथील विशेष न्यायाधीश ए.ए. शहापुरे यांनी दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सन २०१५ मध्ये पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला थंडी ताप आल्याने तिच्या वडिलांनी तिला औषधोपचारासाठी दवाखान्यात आणले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी करण्यास सांगितल्यानंतर ही मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चौकशी केल्यावर आठ महिन्यांपूर्वी सरपण आणण्यासाठी ती गेली असताना आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर सदर पीडित मुलीच्या वडिलांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सदर गुन्ह्याचा तपास फौजदार बी.एम. खंडागळे यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले होते. विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी या खटल्यात १३ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुरावा आणि डी.एन.ए. अहवालावरून पीडित मुलीने जन्म दिलेले बाळ हे आरोपीचे असल्याचे स्पष्ट होत असल्याने आरोपीनेच हा गुन्हा केल्याचे शाबीत झाल्याचा युक्तिवाद संदीप ओहोळ यांनी केला.
न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करीत आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.