बारामती शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी जय पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती शहर राष्ट्रवादीच्या 
अध्यक्षपदी जय पाटील
बारामती शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी जय पाटील

बारामती शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी जय पाटील

sakal_logo
By

बारामती, ता. ६ : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदलास प्रारंभ केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांची निवड केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
बारामती शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून संघटनात्मक फेरबदलाची मागणी कार्यकर्त्यांमधून होत होती. मावळते अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांचा कार्यकाळही संपलेला होता व नव्याने पक्षबांधणीसाठी युवा कार्यकर्त्याची गरज होती. ही बाब ओळखून जय पाटील यांच्यावर अजित पवार यांनी ही जबाबदारी सोपवली. जय पाटील यांनी वृक्षारोपणाच्या मोहिमेत उल्लेखनीय काम केले आहे. नगरसेवकपदाच्या काळात त्यांनी विविध विकासकामांमध्ये सक्रिय योगदान दिलेले आहे. संयमी व मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वांना विश्वासात घेऊन संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावीपणे करणार असल्याचे जय पाटील यांनी नमूद केले.

जय पाटील