ग्रामीण भागातही संपत्ती निर्मितीच्या अनेक संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातही संपत्ती निर्मितीच्या अनेक संधी
ग्रामीण भागातही संपत्ती निर्मितीच्या अनेक संधी

ग्रामीण भागातही संपत्ती निर्मितीच्या अनेक संधी

sakal_logo
By

बारामती, ता. १० : ''''देशातील ग्रामीण भागातही संपत्ती निर्मितीच्या अनेक संधी आहेत, या संधीमधील विसंगती कमी करत ग्रामीण भागालाही माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम बनवत अर्थकारण अधिक सक्षम होणे गरजेचे आहे,'''' असे प्रतिपादन अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

विद्या प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रम २२५० विद्यार्थी व १६० शिक्षकांनी या व्याख्यानास उपस्थिती लावली होती. यावेळी काकोडकर बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार कर्नल (निवृत्त) श्रीश कंभोज या प्रसंगी उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशापुढील आव्हाने आणि उपलब्ध संधी यांचा त्यांनी सविस्तर आढावा भाषणात घेतला. ते म्हणाले, शोषण दूर करण्यासाठी मानवी मूल्ये बळकट करण्याची गरज आहे. भारताला संशोधन आणि विकास क्षेत्रात अधिक उत्पादक बनवण्याची गरज आहे. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. संशोधन आणि विकास (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर भारतात भर देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
ॲड. नीलिमा गुजर यांनी स्वागत केले, प्राचार्या डॉ. के.ए. बारवकर यांनी परिचय करून दिला. डॉ. संगीता गायकवाड यांनी आभार मानले.

स्टॅनफोर्ड विद्यापीठासारख्या संस्थेने अर्थकारणात मोलाचे योगदान दिले आहे. तेथे शिक्षक व विद्यार्थ्यांनी उद्योजक बनत विविध कंपन्या सुरू केल्या. त्यामुळे तेथे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या. यातून मोठा महसूलही गोळा होत आहे. अशाच पद्धतीने भारतातही काम होण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही डॉ.काकोडकर यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

05961