अँग्री-इनोव्हेशन प्रोग्रामसाठी अर्ज करण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अँग्री-इनोव्हेशन प्रोग्रामसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अँग्री-इनोव्हेशन प्रोग्रामसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अँग्री-इनोव्हेशन प्रोग्रामसाठी अर्ज करण्याचे आवाहन

sakal_logo
By

माळेगाव, ता. १० : कॅपजेमिनी इंडियाने येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, आयकेअर, एआयसी एडीटी बारामती फाउंडेशन यांच्यासमवेत अॅग्री-इनोव्हेशन प्रोग्राम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्थानिक शेतकऱ्यांना मदत आणि लाभ मिळवून देण्यासाठी कृषी-संलग्न स्टार्ट-अप्सना मदत करणे हा आहे.
या उपक्रमांतर्गत स्टार्ट-अप्सचे इनक्यूबेशन, फील्ड ट्रायलस, शेतकरी जोडणे, संकल्पनेचा पुरावा/कल्पना प्रमाणीकरण, जागतिक दर्जाच्या मार्गदर्शकांपर्यंत पोहोचणे, संशोधन प्रयोगशाळांच्या सुविधांमध्ये प्रवेश आणि स्टार्टअप इकोसिस्टीम मधील स्टेकहोल्डर लिंकेज यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता असलेल्या तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्सकडून याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
खालील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाधानकारक पर्याय व तंत्रज्ञान देवू पाहणाऱ्या स्टार्टअप्सकडून एआयसी एडीटी बारामती फाउंडेशनच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा https://bit.ly/Agri-innovation-Accelerator या लिंक वर क्लिक करून अर्ज मागविण्यात येत आहेत.

असा आहे कार्यक्रम : १. माती किंवा वनस्पतींच्या ऊतींमधील मॅक्रो/सूक्ष्म पोषक घनता आणि मातीतील सूक्ष्मजीव विविधता तपासणी चाचणीसाठी जलद, अचूक आणि परवडणारी उपकरण/ पद्धत
२. रासायनिक/जैविक/ आयआर पद्धतीद्वारे उत्पादनाचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी तंत्रज्ञान
३. डाळिंबातील जीवाणूजन्य अनिष्ट (तेलकट) रोगाचा प्रादुर्भाव शोधून त्यावर उपचार करण्यासाठी तंत्रज्ञान. ४. कृषी उत्पादनाचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान (नाशवंत फळे आणि भाज्या) ५. निर्यात गुणवत्तेच्या कृषी उत्पादनासाठी जलद, अचूक आणि परवडणारी नावीन्यपूर्ण अवशेष विश्लेषण पद्धत. ६. ताजे उत्पादन/दूध आणि दुग्धजन्य पदार्थ/प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ/पीठ/स्वयंपाक आणि खाण्यासाठी तयार खाद्यपदार्थांची भेसळ तपासण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान ७. ताज्या शेती उत्पादनासाठी शाश्वत आणि जैवविघटनशील पॅकेजिंग उपाय ८. बिया/रोपे/ग्राफ्ट मटेरियल आणि उतिसंवर्धित वनस्पतींमध्ये विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य रोग ओळखण्यासाठी जलद चाचणी पद्धती/किट्स/प्रक्रिया विकसित करणे. ९. ताज्या शेती उत्पादनांसाठी स्मार्ट आणि ऊर्जा कार्यक्षम साठवण सुविधा १०. पारंपरिक भारतीय धान्य वापरून तयार केलेले कार्यात्मक आरोग्यदायी अन्न उत्पादने जे तरुणांमध्ये फास्ट फूडच्या सवयी बदलू शकतात.