बारामतीच्या एम्समध्ये ऑनलाइन राष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीच्या एम्समध्ये 
ऑनलाइन राष्ट्रीय परिषद
बारामतीच्या एम्समध्ये ऑनलाइन राष्ट्रीय परिषद

बारामतीच्या एम्समध्ये ऑनलाइन राष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

बारामती, ता. १२ ः येथील अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एम्स) व राष्ट्रीय मूल्यांकन मान्यता परिषद (नॅक) यांच्या वतीने नुकतीच राष्ट्रीय परिषद ऑनलाइन झाली.
''इनोवेटिव्ह प्रॅक्टिसेस फॉर क्वालिटी एन्हान्समेंट इन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हा या परिषदेचा मुख्य विषय होता. टीसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी परिषदेचे उद्‍घाटन केले. एम्सचे सचिव विकास लेंगरेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. संचालक डॉ. एम. ए. लाहोरी यांनी प्रास्ताविक केले. परिषदेत डॉ. पी. विक्रमन (आण्णा युनिव्हर्सिटी, तमिळनाडू), डॉ. इंद्रजित यादव-पाटील (SMSMPITR, अकलूज), ज्युली डॉमनिक (लिटिल फ्लॉवर कॉलेज, केरळ), डॉ. पवन पटेल (SSIM-हैदराबाद), डॉ. रुपेंद्र गायकवाड (RTCCS नवी मुंबई) यांनी मार्गदर्शन केले.
अनेकान्तचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर, एम्सचे सचिव विकास लेंगरेकर, संचालक डॉ. एम. ए. लाहोरी यांनी मार्गदर्शन केले. संयोजक डॉ. टी. व्ही. चव्हाण, सहसंयोजक डॉ. एस. एस. बडवे यांनी नियोजन केले. या परिषदेत ४० शोधनिबंध सादर केले गेले.