विद्युत पंप चोरीप्रकरणी चार जणांना कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत पंप चोरीप्रकरणी चार जणांना कारावास
विद्युत पंप चोरीप्रकरणी चार जणांना कारावास

विद्युत पंप चोरीप्रकरणी चार जणांना कारावास

sakal_logo
By

बारामती, ता.२१ : विद्युत पंप, केबल, अवजारे चोरीच्या खटल्यात चौघा जणांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एच.अटकारे यांनी पाच महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
अक्षय बाळासाहेब होले, अभिषेक दत्तात्रेय गावडे, अक्षय लक्ष्मण घोलप (तिघे रा.मेडद, ता.बारामती) व संतोष जगन्नाथ बांडेकर (रा. जळगाव कडेपठार, ता. बारामती) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावात शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी, इंजिन व शेतीविषयक अवजारे चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी या चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता आठ चोऱ्या उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर, पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. नितीन होळकुंद्रे यांनी काम पाहिले. त्यांनी २४ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने चौघांना पाच महिन्यांचा कारावास व पाचशे रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.