दलाई लामांकडून बारामतीच्या विपुलचा सन्मान धरमशालातील कमपॅशिनेट लीडरशीप समिटमध्ये सहभागी होण्याची मिळाली संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दलाई लामांकडून बारामतीच्या विपुलचा सन्मान
धरमशालातील कमपॅशिनेट लीडरशीप समिटमध्ये सहभागी होण्याची मिळाली संधी
दलाई लामांकडून बारामतीच्या विपुलचा सन्मान धरमशालातील कमपॅशिनेट लीडरशीप समिटमध्ये सहभागी होण्याची मिळाली संधी

दलाई लामांकडून बारामतीच्या विपुलचा सन्मान धरमशालातील कमपॅशिनेट लीडरशीप समिटमध्ये सहभागी होण्याची मिळाली संधी

sakal_logo
By

बारामती, ता. २३ ः जागतिक कीर्तीचे तिबेटी बौद्ध धर्मगुरू व नोबेल शांतता पारितोषिक विजेते दलाई लामा यांच्या हस्ते बारामतीच्या विपुल शहा यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
धरमशाला (हिमाचल प्रदेश) येथे दलाईंच्या निवासस्थानी झालेल्या दोन दिवसीय कमपॅशिनेट लीडरशीप समिटमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी विपुल यांना मिळाली. शांतता, करुणा व युवा नेतृत्व याविषयावर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जगभरातून १५ युवकांची निवड अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठाद्वारे (युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसन) करण्यात आली होती. गेली दोन वर्षे त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारी व मार्गदर्शन मिळाले. या चर्चासत्राचे नेतृत्व जगविख्यात मनोबुद्धी वैज्ञानिक रिचर्ड डेव्हिडसन तसेच जागतिक कीर्तीचे लेखक डॅनिअल व तारा गोलमन यांनी केले. विपुल याचे उच्च शिक्षण अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून झाले आहे. शिक्षण तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे भारत व जगभरात त्याने केलेली कामगिरी पाहून या कार्यक्रमासाठी त्याची निवड झाली.
दलाई लामांशी संवाद साधताना गांधीजींसोबत स्वातंत्र्य लढ्यात काम केलेल्या आपल्या आजोबांची तसेच, विपश्यना विद्या शिकविलेल्या पूज्य सत्यनारायण गोएंका गुरुजींची आठवण झाल्याचे विपुल यांनी सांगितले. धर्म, राष्ट्र, भाषा यांतील भेद विसरून पृथ्वी आपल्या सर्वांचे एकमेव घर आहे याची आठवण त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना करून दिली. युवकांशी एकूण चार तास हृदयस्पर्शी व मनमिळाऊ संवाद साधताना त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.