दिवाळीत सर्वांनीच एकत्र यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीत सर्वांनीच एकत्र यावे
दिवाळीत सर्वांनीच एकत्र यावे

दिवाळीत सर्वांनीच एकत्र यावे

sakal_logo
By

बारामती, ता. २२ : ‘‘एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे हे एकत्र आले तर तुम्हाला का वाईट वाटत? असा प्रतिप्रश्न पत्रकारांना करत दिवाळीच्या काळात सर्वांनी एकत्र यावे, एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, त्यात लगेच बातमी करायचे काय कारण आहे?’’ असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांना विचारले. शिंदे, फडणवीस व ठाकरे भेटीबाबत काहीही चुकीचे नसल्याचेच नमूद करत तुम्हाला बातम्या मिळत नसल्याने तुम्ही कशाच्याही बातम्या करतात, असे पत्रकारांना अजित पवार म्हणाले.
बारामतीत अजित पवार यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ शंभर रुपयात शिधा देण्याची योजना चांगली असली, तरी त्यात लक्ष देण्याची गरज मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली आहे, अजूनही राज्याच्या अनेक भागात हा शिधा पोहोचलेला नाही, कोणत्या कार्डधारकांना ते मिळणार हाही प्रश्न आहे, यात लक्ष घालावे. ही योजना मध्यमवर्गीयांसाठी का नाही? ठराविक लोकांनाच ही योजना का दिली जाते? सरकारच्या वतीने सवलतीच्या दरात द्यायचे असेल; तर गरीब आणि मध्यमवर्गीय दोघांनाही ती मदत मिळायला हवी. कोणतीही योजना राबविताना त्याचे व्यवस्थित नियोजन करावच लागत, नाहीतर योजनेचा बोजवारा उडतो. चारपैकी दोन किंवा तीन वस्तू देऊन चालणार नाही, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा संबंधित विभागाचे मंत्री जरी हे किट लोकांपर्यंत पोहोचले, असे सांगत असले तरी ते अजूनही राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेले नाही, उलट काही ठिकाणी या शिधाचा काळाबाजार सुरू असल्याचे काही पत्रकारांनीच मला सांगितले आहे. दिवाळीच्या काळात हा आलेल्या व्यत्ययच असून सरकारचे हे अपयश आहे.’’

अतिवृष्टीने बळिराजाचे जे नुकसान झाले आहे, त्याला तातडीने मदत झाली तरच त्याचा उपयोग होईल, ५० हजारांची मदत करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, त्याबद्दल सरकारचे आभार आहे, पण मागणी करूनही जे निर्णय होत नाही, त्या बद्दल मी खेद व्यक्त करतो.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते