बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळा
बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळा

बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळा

sakal_logo
By

बारामती, ता. ३० ः सामाजिक एकात्मता जोपासत साईच्छा सेवा ट्रस्टने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या संकल्पनेतून बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. पालखीच्या प्रस्थानप्रसंगी पवार बोलत होत्या. या उपक्रमाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण व नगर जिल्ह्यातील अनेक साईभक्त यात सहभागी होत आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून आध्यात्मिक समाधान मिळत असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले. या वेळी पालखी सोहळ्यातील वाहक हरिभाऊ केदारी यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पवार यांचे वाढदिवस व दीपावली पाडवानिमीत्त साईबाबांच्या जीवनावर आधारित ‘साई दरबार’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले. किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजित जाधव, नवनाथ बल्लाळ, राजेंद्र बनकर, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, विजय खरात, किशोर मासाळ, अजीज शेख, सुजित जाधव, भारती मुथा, दिनेश जगताप, के. टी जाधव, राहुल मोरे आदी उपस्थित होते.