बारामती बसस्थानकातून महिलेच्या दागिन्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती बसस्थानकातून
महिलेच्या दागिन्यांची चोरी
बारामती बसस्थानकातून महिलेच्या दागिन्यांची चोरी

बारामती बसस्थानकातून महिलेच्या दागिन्यांची चोरी

sakal_logo
By

बारामती, ता. ३१ : बारामती येथील बसस्थानकावर प्रवासासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ८६ हजारांच्या दागिन्यांची चोरी झाली.
याबाबत मोनाली सुदेश कुदळे (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. बुधवारी (ता. २६) ही घटना घडली. याप्रकरणी शनिवारी (ता. २९) फिर्याद दाखल केली. फिर्यादी या बारामती बसस्थानकावरून बारामती- इंदापूर एसटीने निमगाव केतकी येथे जाण्यासाठी बसमध्ये चढल्या. त्यांनी वाहकाला तिकिटाचे पैसे देण्यासाठी पर्स काढली असता पर्सची चेन उघडी दिसली. आतील दागिन्यांच्या कप्प्यात पाहिले असता त्यात ठेवलेले सोन्याचे गंठण व मिनी गंठण चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याकडील ५६ हजारांचे गंठण व ३० हजारांचे मिनी गंठण चोरीला गेले.