ऊसउत्पादकांचा सोमवारी मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊसउत्पादकांचा सोमवारी मोर्चा
ऊसउत्पादकांचा सोमवारी मोर्चा

ऊसउत्पादकांचा सोमवारी मोर्चा

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : यंदा तुटलेल्या उसाला गतवर्षीच्या एफआरपीच्या प्रमाणात उचल व इथेनॉलचे ३५० रुपये द्यावेत, राज्यातील अनेक कारखान्यात वजनकाट्यात होणारी फसवणूक थांबवावी व ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाबाबत गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फतच व्यवहार व्हावेत, अशा मागण्यांसाठी येत्या सोमवारी (ता. ७) पुण्यातील साखर संकुलावर मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.
बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सतीश काकडे, राजेंद्र ढवाण, अमर कदम आदी यावेळी उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, ‘‘पेट्रोलपंपांचे डिजिटायझेशन होते, तर दोनशे साखर कारखान्यातील वजनकाट्यांचे का होत नाही? ऑनलाइन सर्वांना वजन दिसावे, यात पारदर्शकता यावी, सरकारने यात कारवाई करावी. गतवर्षी ४६०० कोटींची साखर विविध साखर कारखान्यांनी वजनकाट्याच्या घोळात गायब केली. ऊसतोडणी कामगारांचा पुरवठा गोपीनाथ मुंडे महामंडळाकडून व्हावा, बांधकाम कामगारांप्रमाणे त्यांचीही नोंदणी व्हावी, महामंडळानेच ऊसतोडणीच्या टोळ्या पुरवाव्यात म्हणजे उचल बुडणार नाही. ऊसतोडणी कामगारांच्या नावाखाली गोळा होणाऱ्या पैशांचा हिशेबच देणार नसाल; तर ऊस उत्पादक पैसे देणार नाहीत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी १७ व १८ नोव्हेंबरला लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन करणार आहे.’’

इथेनॉलमुळे कारखान्यांना होणारा फायदा ऊसउत्पादकांना मिळायला हवा. पूर्वीच्या काळी केलेले ‘एफआरपी’चे सूत्रच आता बदलायला हवे. साखर कमी करून इथेनॉल करायचे असेल; तर एफआरपीचे निकषही बदलायला हवेत.
- राजू शेट्टी, संस्थापक,
स्वाभिमानी शेतकरी संघटना