बारामतीत दोनशे बेडच्या हॉस्पिटलची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत दोनशे बेडच्या हॉस्पिटलची मागणी
बारामतीत दोनशे बेडच्या हॉस्पिटलची मागणी

बारामतीत दोनशे बेडच्या हॉस्पिटलची मागणी

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : ई. एस. आय. सी. चे २०० बेड क्षमतेचे हॉस्पिटल बारामतीत उभारण्याची मागणी आहे. याबाबत बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेला प्रस्ताव केंद्रीय कामगार मंत्रालयाने नवी दिल्लीतील ई. एस. आय. सी. मुख्यालयाकडे पाठवला आहे.
मुख्यालयातील उपचिकित्सा आयुक्त डॉ. कनिका कालरा यांनी पत्राद्वारे बारामती इंडस्ट्रिअल मनुफॅक्चरर्स असोसिएशनला याबाबत माहिती दिल्याचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.
केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदींकडे बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माध्यमातून उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेश्याम सोनार, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, मनोज पोतेकर, संभाजी माने, अंबीरशाह शेख वकील, शिवाजी निंबाळकर, हरीश कुंभरकर, हरिभाऊ थोपटे, श्रीमती चारुशीला धुमाळ आदी पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत आहे.