बारामतीत गोळीबारात माध्य प्रतिनिधी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत गोळीबारात 
माध्य प्रतिनिधी जखमी
बारामतीत गोळीबारात माध्य प्रतिनिधी जखमी

बारामतीत गोळीबारात माध्य प्रतिनिधी जखमी

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ‘रायझिंग महाराष्ट्र’ या वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश उर्फ आकाश जाधव यांच्यावर गुरुवारी (ता. ३) सायंकाळी गोळीबार झाला. यामध्ये त्यांच्या मणक्याखाली गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना उपचारार्थ शहरातील बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
बारामती शहरातील अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलिस माहिती घेत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, बारामतीमध्ये भांडणांमध्ये आता बंदुकीचा वापर सुरू झाल्याने शहरात काळजीचे वातावरण आहे. हल्ले करून बंदुकीचा वापर होत असेल; तर ही बाब चिंताजनक असल्याचे नागरिकांचे मत आहे.