बारामतीत भ्रष्टाचार मुक्तीबाबत पथनाट्याद्वारे जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत भ्रष्टाचार मुक्तीबाबत पथनाट्याद्वारे जागृती
बारामतीत भ्रष्टाचार मुक्तीबाबत पथनाट्याद्वारे जागृती

बारामतीत भ्रष्टाचार मुक्तीबाबत पथनाट्याद्वारे जागृती

sakal_logo
By

बारामती, ता. ६ : येथील झैनूबिया इंग्लिश मीडियम स्कूल आणि बारामती हार्डवेअर स्टोअर (एच.पी गॅस) यांच्या वतीने बारामतीत भ्रष्टाचार मुक्त भारत-विकसित भारत या अभियानाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी बारामतीत विविध ठिकाणी ''''भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत" यावर पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती केली.
भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड असून प्रत्येक नागरिकाने भ्रष्टाचार करायचा नाही व करूही द्यायचा नाही. राष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी संकल्प करायचा, असा संदेश या पथनाट्याच्या वतीने दिला गेला. शाळेच्या प्राचार्या इन्सिया नासिकवाला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

06180