बारामतीत आज राष्ट्रवादीचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत आज 
राष्ट्रवादीचे आंदोलन
बारामतीत आज राष्ट्रवादीचे आंदोलन

बारामतीत आज राष्ट्रवादीचे आंदोलन

sakal_logo
By

बारामती, ता. ७ : खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द बोलल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले असून, मंगळवारी (ता. ८) राष्ट्रवादी निषेधासाठी रस्त्यावर उतरणार आहे.
बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष जय पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध केला असून, अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता भिगवण चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र जमून सत्तार यांचा निषेध करणार असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याची माहिती जय पाटील यांनी दिली.
दरम्यान, सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संतप्त भावना असून, शहर पोलिस ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षकांची भेट घेत त्यांना आपल्या भावना सांगितल्या.