मतदारयादी कार्यक्रमात सहभागी व्हा : कांबळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदारयादी कार्यक्रमात
सहभागी व्हा : कांबळे
मतदारयादी कार्यक्रमात सहभागी व्हा : कांबळे

मतदारयादी कार्यक्रमात सहभागी व्हा : कांबळे

sakal_logo
By

बारामती, ता. ९ : केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता तारखेवर घोषित केलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तहसीलदार विजय पाटील, निवडणूक नायब तहसीलदार पी. डी. शिंदे उपस्थित होते.

एकत्रीकृत प्रारूप मतदारयाद्या ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. १९ व २० नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर मतदारनोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारणे यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढल्या जाणार आहेत. मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. संक्षिप्त पुनरिक्षण काळात विद्यार्थी, दिव्यांग महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या लक्षित घटकांसाठीही विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

वर्षातून चार वेळा मतदारनोंदणी
आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता तारीख असायचा. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेअंतर्गत आगाऊ मतदारनोंदणी करता येणार आहे.