बारामती येथे प्रतिभा वक्तृत्व स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती येथे प्रतिभा वक्तृत्व स्पर्धा
बारामती येथे प्रतिभा वक्तृत्व स्पर्धा

बारामती येथे प्रतिभा वक्तृत्व स्पर्धा

sakal_logo
By

बारामती, ता. २० ः विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचे यंदाचे हे २१ वे वर्ष असून १२ व १३ डिसेंबर रोजी या स्पर्धा होणार आहेत. तर, प्राथमिक फेरी (निवड चाचणी) ऑनलाइन लाइव्ह सादरीकरण पद्धतीने कनिष्ठ विभाग २ डिसेंबर व वरिष्ठ विभाग ३ डिसेंबर रोजी मराठी भाषेतूनच होणार आहे. दोन्ही विभागांसाठी सांघिक स्तरावर स्वतंत्र ‘प्रतिभा सन्मानचिन्ह’ देण्यात येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे व संयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी दिली.
कनिष्ठ विभागासाठी पसायदान आणि विश्वशांती, सण - उत्सवांचे बाजारीकरण, कोरोनाची लस आली पण माणुसकीची लस कधी ?, खादी...वस्त्र नव्हे विचार, करू जागर मराठीचा असे विषय आहेत तर, वरिष्ठ विभागासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरची आव्हाने, मरण स्वस्त होत आहे, जी. ए. : साहित्य प्रवासातील गूढयात्री, नित्य नव्या आव्हानांना भिडणारा लोकनेता - शरद पवार,
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सत्यशोधक चळवळ असे विषय देण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहितीसाठी vpasccollege.edu.in या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी मराठी विभागप्रमुख आणि या स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. आनंदा गांगुर्डे ८१४९१४२४५३, डॉ. श्रीराम गडकर ९१६४८५००३५, सुनील डिसले ९९६०२४८५१७, नंदकुमार खळदकर ८९७५०६२८९७, प्रा. शिवाजी टकले ९८६०९९३२१९ यांच्याशी संपर्क साधावा.