बारामतीत मनसेतर्फे राहुल गांधी यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत मनसेतर्फे राहुल गांधी यांचा निषेध
बारामतीत मनसेतर्फे राहुल गांधी यांचा निषेध

बारामतीत मनसेतर्फे राहुल गांधी यांचा निषेध

sakal_logo
By

बारामती, ता. १८: येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. भिगवण चौकात मनसेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राहुल गांधी याच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध व्यक्त केला.
सावरकर यांच्याबद्दल गांधी जे बोलले त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचा घोषणा देत निषेध केला. या वेळी ॲड. सुधीर पाटसकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.पोपटराव सूर्यवंशी, बारामती तालुका अध्यक्ष ॲड. नीलेश वाबळे, शहर उपाध्यक्ष स्वप्नील मोरे, प्रवीण धनराळे, ॲड.सोमनाथ पाटोळे, तालुका संघटक ऋषिकेश भोसले, अक्षय कदम, अतुल कुंभार, शिवप्रतिष्ठानचे संग्रामसिंह जाचक तसेच हिंदुत्ववादी नागरिक उपस्थित होते

06226