बारामतीत पर्यटन केंद्रासाठी प्रयत्नशील : अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत पर्यटन केंद्रासाठी
प्रयत्नशील : अजित पवार
बारामतीत पर्यटन केंद्रासाठी प्रयत्नशील : अजित पवार

बारामतीत पर्यटन केंद्रासाठी प्रयत्नशील : अजित पवार

sakal_logo
By

बारामती, ता. १९ : ‘‘आगामी काळात बारामती पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, या साठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील आहेत,’’ अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
बारामतीत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच बारामतीत पर्यटनाच्या दृष्टीनेही कामे सुरु आहेत. केरळ, राजस्थान, कर्नाटकसारख्या राज्यात पर्यटन विकसित झालेले आहे, बारामतीतही वनविभागामध्ये बोटिंग, गजिबो, पार्किंग, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, अशा बाबी सुरु होणार आहेत. या शिवाय कऱ्हा नदीचे सुशोभीकरण व नीरा डावा कालव्याचे सुशोभीकरण होत आहे. तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौकापर्यंत पदपथाचे सुशोभीकरण केले जात आहे. नागरिकांना चार क्षण विरंगुळा मिळावा, या उदेदशाने ही कामे मार्गी लावली जात आहेत.’’
‘‘सत्ता असो वा नसो शंभर टक्के सर्वांनाच नोकरी देता येणे शक्य नाही, छोटे-मोठे उद्योग सुरु केले; तर त्यात नोकरीच्या संधी निर्माण करता येतील. यात स्थानिकांना प्राधान्य देता येईल, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो म्हणून बारामतीच्या परिसरामध्ये अलीकडच्या काळात आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची काम घेतोय, त्याचा परिणाम येत्या काही काळात दिसून येईल,’’ असे अजित पवार यांनी सांगितले.