बारामतीत गिरीराजमध्ये हृदयरोग तपासणी शिबिराला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत गिरीराजमध्ये हृदयरोग तपासणी शिबिराला प्रारंभ
बारामतीत गिरीराजमध्ये हृदयरोग तपासणी शिबिराला प्रारंभ

बारामतीत गिरीराजमध्ये हृदयरोग तपासणी शिबिराला प्रारंभ

sakal_logo
By

बारामती, ता. २१ : अनंत आरोग्य सेवा योजनेच्या माध्यमातून गिरिराज हॉस्टिपलचे डॉ. रमेश भोईटे यांच्या संकल्पनेतून शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व कार्डिऍक बायपास शस्त्रक्रिया शिबिराचा प्रारंभ झाला आहे.
बारामतीतील गिरिराज हॉस्पिटल येथील गिरिराज हार्ट केअर सेंटरमध्ये ११ नोव्हेंबर पासून शिबिर सुरू झाले आहे. गेल्या पाच वर्षापासून हृदयरोग शिबिराचे नियमित आयोजन करण्यात येत असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेकडो रुग्णांना यांचा फायदा झाला आहे. शिबिराच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी डॉ. अनिरुद्ध ढेकणे, डॉ. सनी शिंदे, डॉ. वरुण देवकाते, डॉ. मेहुल ओस्वाल, डॉ. राजीव खरे, डॉ. शशिकांत काळे, डॉ. संतोष घालमे, महाव्यवस्थापक प्रशांत भोसले आदींशी चर्चा केली.
छातीत वेदना, जडपणा, धडधड व अस्वस्थपणा, श्वास घेण्यास त्रास होणे, अति घाम, जबड्यापासून डाव्या हाताकडे वेदना, आनुवंशिक हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणा, मांसाहार दारू व तंबाखूचे अतिसेवन अशी लक्षणे असणाऱ्यांवर उपचार होतील.
या शिबिरात पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक रुग्णांची मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व कार्डिऍक बायपास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरासाठी येताना पूर्व तपासणीचे रिपोर्ट व औषधे पिवळे व केशरी रेशन कार्ड आधार कार्ड, मतदान कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. १२ जानेवारी २०२३ पर्यंत शिबिर चालणार असून रुग्णांनी हृदयरोग शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. नोंदणीसाठी गिरिराज हार्ट सेंटर ९६७३००३०१४, ९२२५५८३३७१ किंवा प्रशांत भोसले ८५३०४२५५११ यांच्याशी संपर्क साधावा.