सुजाण पालकत्व ही एक कला : वाबळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुजाण पालकत्व ही एक कला : वाबळे
सुजाण पालकत्व ही एक कला : वाबळे

सुजाण पालकत्व ही एक कला : वाबळे

sakal_logo
By

बारामती, ता. २१ : विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळेत सुजाण पालकत्व या विषयावर पालकांसाठी व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी मनोज वाबळे म्हणाले ‘‘मुलाच्या जन्मानंतर पहिले एक हजार दिवस मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे असतात. यासाठी पालक म्हणून आईवडील यांची भूमिका महत्त्वाची आहे. मुलांना तुम्ही कशा वातावरणात वाढविता यावर त्यांचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असते. स्वतःला ओळखणे ही ज्ञानाची खरी सुरूवात आहे. यासाठी पालकांनी पाल्यामधील चांगल्या बाबी शोधून त्या विकसित होण्यासाठी पूरक वातावरण तयार करावे. पालकांनी मुलांमधील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. त्यासाठी घरातील वातावरण पोषक ठेवावे. मुलांना एकलकोंडे बनवू नका. त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नका.’’ प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा शिंदे यांनी केले.