बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन दिवसांत ७१५६ मतदारनोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून 
तीन दिवसांत ७१५६ मतदारनोंदणी
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन दिवसांत ७१५६ मतदारनोंदणी

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन दिवसांत ७१५६ मतदारनोंदणी

sakal_logo
By

बारामती, ता. २२ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेल्या तीन दिवसांत राबविण्यात आलेल्या मतदार जागृती अभियानास बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील वीस प्रभागांत राबविलेल्या या अभियानात तीन दिवसांत ७१५६ नवीन मतदारांची नोंदणी झाली.

पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील यांच्या पुढाकारातून शनिवारी (ता. १९) सुरू झालेल्या या अभियानाची सोमवारी (ता. २१) सांगता झाली. शहरातील २० प्रभागांत एकूण २२ नोंदणी व माहिती देणारी केंद्रे सुरू करण्यात आले होते. या केंद्रांवर एकूण तीन दिवसांत मतदार जागृती अभियानांतर्गत ७१५६ जणांची मतदारनोंदणी करण्यात आली.

शहरातील अनेक हयात नसलेल्या मतदारांची नावे अनेक दिवसांपासून मतदारयादीत आहेत, ही बाब या अभियानाच्या माध्यमातून समोर आली होती. त्यानुसार मयत मतदारांची नावे कमी करण्याचीही मोहीम पक्षाच्या वतीने राबविली जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या अभियानातही ही नावे कमी केली गेली.

काही मतदारांची नावे दोन मतदान केंद्रांवर आढळून आली, ही नावेही एकाच ठिकाणी जोडून घेण्याची प्रक्रिया राबविली गेली. नावे मतदारांच्या सोयीनुसार एकाच यादीत राहतील, याबाबत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. शिवाय नवीन मतदारनोंदणी करून घेतली जाणार आहेत. प्रभागातील तीन दिवसांचे अभियान पूर्ण झाले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात ८ डिसेंबरपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले मतदार जागृती अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहे. प्रत्येक प्रभागात स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘टीमवर्क’ उत्कृष्टपणे केल्याने चांगले यश मिळाले. नवमतदार मतदानापासून वंचित राहू नये हा यामागचा उद्देश आहे
- जय पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बारामती