खंडित वीजपुरवठ्याने बारामतीकर हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडित वीजपुरवठ्याने बारामतीकर हैराण
खंडित वीजपुरवठ्याने बारामतीकर हैराण

खंडित वीजपुरवठ्याने बारामतीकर हैराण

sakal_logo
By

बारामती, ता. २२ : शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे मंगळवारी वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरू होते. या बाबीपेक्षाही वीजपुरवठा कशाने खंडित झाला आणि तो पुन्हा पूर्ववत केव्हा होणार या प्रश्नांनीच नागरिक हैराण झाले, त्यात याची माहिती नेमकी कोणाकडून घ्यायची हेच माहिती नसल्याने लोकांना अधिकच मनस्ताप झाला.

दरम्यान, महावितरणशी या बाबत संपर्क साधला असता राज्यभरात आता तक्रार निवारणासंदर्भात टोल फ्री क्रमांक देण्यात आलेले असून, त्यावर तक्रार केल्यानंतर त्याची माहिती संबंधित विभागाकडे त्वरेने दिली जाते व अधिकारी कर्मचारी तेथील तांत्रिक दोष-दुरुस्तीसाठी तत्परतेने काम करतात, अशी माहिती दिली गेली. यामध्ये ठरावीक काळाहून अधिककाळ जर वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी कालावधी लागणार असेल तर त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने तशा आशयाचा मेसेज त्या विभागातील वीजग्राहकांना त्वरेने पाठविणे गरजेचे असते, तसे अनेकदा होत नाही, त्याचा मनस्ताप लोकांना सहन करावा लागतो.

वीजपुरवठा पूर्वनियोजित वेळापत्रकासाठी खंडित होणार असेल तर त्याचे मेसेज येतात पण अनेकदा केबल तुटणे किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा इतर काही कारणांमुळे वीज खंडित होते, तेव्हा मात्र नागरिक हैराण होतात, अशावेळी वीजपुरवठा कधी पूर्ववत होणार, याची माहिती मिळावी अशी अपेक्षा असते.

महावितरण म्हणते हे करा....
• वीजपुरवठा खंडित झाला असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईवरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर फक्त एक मिस्ड कॉल दिला, की तुमच्या भागातील अधिकाऱ्यांना वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती दिली जाईल.

• वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत तुम्ही १९१२ तसेच १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या क्रमांकावरही संपर्क साधून तक्रारीची माहिती देऊ शकता.

• ही राज्यभरासाठीची केंद्रित पद्धत असून, तातडीने वरिष्ठ पातळीवरून संबंधित अधिकाऱ्यांना याच्या सूचना जातात, तुमची तक्रार कोणत्या व्यक्तीकडे पाठवली गेली आहे, याचीही माहिती ग्राहकांना मिळते.