बालविवाहाच्या प्रकरणात वसतिगृह अधिक्षिकेस शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालविवाहाच्या प्रकरणात
वसतिगृह अधिक्षिकेस शिक्षा
बालविवाहाच्या प्रकरणात वसतिगृह अधिक्षिकेस शिक्षा

बालविवाहाच्या प्रकरणात वसतिगृह अधिक्षिकेस शिक्षा

sakal_logo
By

बारामती, ता. २३ : बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा आनंद आपटे यांनी बारामती येथील प्रेरणा महिला वसतिगृहाच्या तत्कालिन अधिक्षिका लता वसंतराव राठोड यांना एक महिना साधी कैद व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. आदित्य अविनाश रणसिंग यांनी कामकाज पाहिले. या संदर्भात बारामती तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले होते. त्यामध्ये पोलिस कर्मचारी पोपट कवितके यांनी सहकार्य केले. सन २०१५ मध्ये एका अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाच्या प्रकरणाचा गुन्हा तालुका पोलिसात दाखल झाला होता. त्यात ही शिक्षा सुनावण्यात आली.
प्रेरणा महिला वसतिगृहाच्या अधिक्षिकापदावर कार्यरत असताना दाखल होणाऱ्या प्रवेशितांच्या भविष्याची काळजी घेणे, हे कर्तव्य असतानादेखील पिडीत अल्पवयीन असताना धाक दाखवित विवाह करण्यास भाग पाडले, बालविवाह प्रतिबंधक कायदा असताना अधिक्षिकांनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, कमी दंडाची शिक्षा दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, तसेच परिविक्षा अधिनियमातील तरतूदींचा लाभ दिला गेल्यास इतर पदाधिकारीदेखील पदाचा गैरवापर करून असे प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा उल्लेख न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या निकालपत्रात केला आहे.