बारामतीचे दोन विद्यार्थी करणार भारताचे प्रतिनिधित्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीचे दोन विद्यार्थी करणार भारताचे प्रतिनिधित्व
बारामतीचे दोन विद्यार्थी करणार भारताचे प्रतिनिधित्व

बारामतीचे दोन विद्यार्थी करणार भारताचे प्रतिनिधित्व

sakal_logo
By

बारामती, ता. २५ : हिमाचल प्रदेशातील सोलन येथील महाराजा अग्रसेन विद्यापीठ, येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कॉर्फबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने रजत पदक प्राप्त केले.
या संघातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा खेळाडू प्रणव पोमणे याची पटाया (थायलंड) येथे होणाऱ्या आय.के.एफ. आशिया ओशिएनिया कॉर्फबॉल स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. या शिवाय महाविद्यालयातील मंथन भोकरे याची
डेहराडून (उत्तराखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिरातून श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे होणाऱ्या दक्षिण आशियायी कराटे स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. प्रणव पोमणे, मंथन भोकरे, प्रशिक्षक डॉ. गौतम जाधव, अशोक देवकर यांचे संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी अभिनंदन केले.