टीसीच्या खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारात निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीसीच्या खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारात निवड
टीसीच्या खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारात निवड

टीसीच्या खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारात निवड

sakal_logo
By

बारामती, ता. १ ः येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात प्रशंसनीय कामगिरी करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात स्थान मिळविले.
सायली नासेरी, वैभव तावरे व निखिल लाड यांची अनुक्रमे अमरावती व नांदेड येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलिबॉल स्पर्धा व औरंगाबाद येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सव व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.साहिल शेख याची उदयपूर येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा व औरंगाबाद येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सव बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.
ओंकार गाडे याची जबलपूर येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा व औरंगाबाद येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सव कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. रेणुका अरसूल व शिवानी घोडके यांची जम्मू येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली. खेळाडूंच्या अथक परिश्रमाचेच हे फलित असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी सांगितले.
या सर्व खेळाडूंना डॉ. गौतम जाधव व अशोक देवकर यांनी मार्गदर्शन केले, या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.