नेत्यांची नावे सांगून शिक्षिकेची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेत्यांची नावे सांगून
शिक्षिकेची फसवणूक
नेत्यांची नावे सांगून शिक्षिकेची फसवणूक

नेत्यांची नावे सांगून शिक्षिकेची फसवणूक

sakal_logo
By

बारामती, ता. १ : ‘नेतेमंडळीशी ओळख आहे, तुम्हाला पदोन्नती मिळवून देतो,’ असे सांगत एका शिक्षिकेला फसविणाऱ्या डॉ. कृष्णा शेषराव जेवादे (रा. बारामती) व सोमनाथ इंगळे (रा. सोमवार पेठ, फलटण, जि. सातारा) यांच्याविरूद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी स्मिता विश्राम वाघोले (रा. राऊ कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी ओळख आहे, असे सांगून जेवादे व इंगळे यांनी त्यांचा विश्वास संपादन करत तीन लाखांची फसवणूक केली. त्यांनी दहा लाखांची मागणी केली होती, त्यापैकी तीन लाख रुपये वाघोले यांनी त्यांना ‘फोनपे’द्वारे पाठविले होते. त्यानंतर पुण्यात दीड लाख रोख व पुन्हा साडेपाच लाख रुपये बारामतीत घेतले. तुमचे काम नाही झाले तर पैसे परत करतो, असेही जवादे याने सांगितले होते. प्रत्यक्षात काम न झाल्याने वाघोले यांनी संपर्क केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे वाघोले यांनी थेट अजित पवार यांच्या कार्यालयाकडे धाव घेत ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.