बारामतीत सरपंचपदासाठी १०८ जणांचे अर्ज दाखल दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत सरपंचपदासाठी
१०८ जणांचे अर्ज दाखल दाखल
बारामतीत सरपंचपदासाठी १०८ जणांचे अर्ज दाखल दाखल

बारामतीत सरपंचपदासाठी १०८ जणांचे अर्ज दाखल दाखल

sakal_logo
By

बारामती, ता २ : बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी सरपंचपदासाठी १०८; तर सदस्यपदासाठी ५९८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले.
सरपंचपदासाठी मोरगाव येथे ६, काऱ्हाटीत ४, लोणी भापकरला ५, मासाळवाडीत ५, पळशीला ५, पणदरे येथे ११, कुरणेवाडीत ११, वाघळवाडीत १३, मुरुम येथे १४, वाणेवाडीत ७, गडदरवाडीला ५, सोरटेवाडीत ५ व सोनकसवाडी येथे १७, असे एकूण १०८ अर्ज दाखल झाले.
सदस्यपदासाठी मोरगाव येथील ३९, काऱ्हाटीत ३४, लोणी भापकरला ३८, मासाळवाडीत २२, पळशी येथे २६, पणदरे येथे १०४, कुरणेवाडीत ३४, वाघळवाडीत ६१, मुरुम येथे ७५, वाणेवाडीत ४६, गडदरवाडीत २२, सोरटेवाडीत २१ व सोनकसवाडी येथे ७६, असे एकूण ५८८ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.