बारामती राष्ट्रवादी युवकाध्यक्षपदी अविनाश बांदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती राष्ट्रवादी युवकाध्यक्षपदी अविनाश बांदल
बारामती राष्ट्रवादी युवकाध्यक्षपदी अविनाश बांदल

बारामती राष्ट्रवादी युवकाध्यक्षपदी अविनाश बांदल

sakal_logo
By

बारामती, ता. ४ ः येथील बारामती शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अविनाश बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार व बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जय पाटील यांच्या शिफारशीनंतर अविनाश बांदल यांना नियुक्तीचे पत्र दिले. नवीन चेह-यांना संधी देण्याचे अजित पवार यांनी निश्चित केले असून, जय पाटील यांच्या पाठोपाठ नव्या दमाच्या एका कार्यकर्त्यास अजित पवारांनी थेट युवकाध्यक्षपदाची संधी दिली आहे.

आगामी काळात बारामती नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याकडे अजित पवार यांनी लक्ष दिले असून, आगामी काळात अजून काही संघटनात्मक फेरबदल होणार असल्याचे जय पाटील यांनी सांगितले. जय पाटील यांच्यासह राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे शहराध्यक्ष तुषार लोखंडे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सचिन सातव, किरण गुजर यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
-----------------------

फोटो- अविनाश बांदल