Tue, Jan 31, 2023

बारामतीत युवकांनी घातले सूर्यनमस्कार
बारामतीत युवकांनी घातले सूर्यनमस्कार
Published on : 13 December 2022, 9:24 am
बारामती, ता. १३ : येथील बारामती सायकल क्लबचे सदस्य रमेश साळुंखे व अमोल गावडे यांनी प्रत्येकी १२१२ सूर्यनमस्कार घालत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मैदानावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या दोघांनी हे सूर्यनमस्कार घातले.
पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी सव्वा आठ वाजेपर्यंत या दोघांनी सलग हे सूर्यनमस्कार घातले. या संपूर्ण सूर्यनमस्काराचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी सूर्यनमस्कार घालण्याच्या प्रक्रियेची तयारी केली होती. दररोज कसून सराव करीत असल्यामुळे त्यांनी सहजतेने हे १२१२ सूर्यनमस्कार घातले. त्यांनी यापूर्वीही अशाच पद्धतीने १२१२ सूर्यनमस्कार घातले होते.