पुण्यात पाच जानेवारीला मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात पाच जानेवारीला 
मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर
पुण्यात पाच जानेवारीला मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर

पुण्यात पाच जानेवारीला मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर

sakal_logo
By

बारामती, ता. १६ ः भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ जानेवारी रोजी पुण्यातील संचेती रुग्णालयात २९ वे “मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर” होणार आहे.
संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत यांनी ही माहिती दिली.
विश्वविख्यात प्लॅस्टिक सर्जन स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित (अमेरिका) यांनी भारतात येऊन २ लाख ८८ हजारांहून अधिक मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या. गेल्या ११ वर्षापासून त्यांच्या स्मरणार्थ देशभरात या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अमेरिकेतील त्यांचे शिष्य प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ.लॉरेन्स ब्रेनर, लिंडा पॅटरसन या शस्त्रक्रिया करतात.
येत्या ५ ते ८ जानेवारी २०२३च्या शिबिरामध्ये दोनशेहून अधिक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष आनंद छाजेड यांनी दिली. अधिक माहितीसाठी विजय पारख ९८२२४ २४३१६ व राजेंद्र सुराणा ९३७१० २३१६१ यांच्याशी संपर्क साधावा.


या शस्त्रक्रिया होणार...
या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओठ, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य होतील. यंदा चेहऱ्यावरील व्रण व डाग यावर शस्त्रक्रिया होणार नाहीत.