बारामतीत हॉटेल चालकावर हल्ला करणाऱ्यांवर ‘मोका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत हॉटेल चालकावर
हल्ला करणाऱ्यांवर ‘मोका’
बारामतीत हॉटेल चालकावर हल्ला करणाऱ्यांवर ‘मोका’

बारामतीत हॉटेल चालकावर हल्ला करणाऱ्यांवर ‘मोका’

sakal_logo
By

बारामती, ता. १८ : बारामती शहरातील हॉटेल चालकावर तलवारीने वार करून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदेश संजय कुचेकर, साहिल सिकीलगर, ऋषीकेश चंदनशिवे, तेजस बच्छाव, यश जाधव यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदाअंतर्गत (मोका) कारवाई केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्यांनी त्याला मंजुरी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांना विशेष साहाय्य केले.
या सर्व आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, घराविषयी आगळीक व दंगल या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यांना अटक केली, तेव्हापासून ते येरवडा कारागृहात आहेत. यापूर्वीसुद्धा या सर्वांनी बारामतीत दहशत पसरवण्यासाठी गुन्हे केलेले आहेत. पुढील तपास विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.