
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानचे कबड्डी स्पर्धेत यश
बारामती, ता. २२ : कोपरगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या (सीबीएसई) १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
संघाची कर्णधार सलोनी जाधव, सानिका जाधव, साक्षी गायकवाड, गौरी कोरडे, साक्षी लोकरे, सृष्टी खडके, तोषणा माने या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. कबड्डी प्रशिक्षक पारस बाबर यांनी मार्गदर्शन केले. या संघाची जानेवारी महिन्यामध्ये हरियानातील बहादूरगढ येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथे होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली.
याच शाळेतील १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने कर्णधार शाश्वत आटोळे, शुभांश त्रिपाठी, कृष्णा पालीवाल, अभिमान मुरूमकर, आदित्य शितोळे, यश वाबळे, आयुष सोनवणे, यश आटोळे यांच्या संघाने चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकाविला. प्रशिक्षक पारस बाबर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल प्राचार्या राधा कोरे यांनी दोन्ही संघाचे अभिनंदन केले.