Tue, Feb 7, 2023

बारामतीत रयत निबंध स्पर्धेचे उद्घाटन
बारामतीत रयत निबंध स्पर्धेचे उद्घाटन
Published on : 25 December 2022, 11:09 am
बारामती, ता. २५ : रयत कृतज्ञता सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित राज्यस्तरीय शालेय ऑनलाइन निबंध स्पर्धेचे उद्घाटन आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलमध्ये रविवारी (ता. २५) झाले. यावेळी माजी आमदार जयदेव गायकवाड, ॲड. राम कांडगे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, दिलीप ढवाण, हनुमंत वाबळे, अमोल पाटील, लालासाहेब नलावडे, बंडू पवार, पोपट मोरे, सुभाष लकडे, अर्जुन मलगुंडे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम पार पडला.
निबंध स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहणारे महेंद्र जोशी, संजय निर्मळ, लहू रोडे, महिपत मोरे, अशोक लडकत यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विभागीय अधिकारी रत्नपारखी यांनी केले. एस.टी. पवार यांनी आभार मानले.
विकास जाधव व ऊर्मिला भोसले यांनी सूत्रसंचालन केले.