जळोचीतील जनावरांचा बाजार उद्यापासून सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळोचीतील जनावरांचा बाजार उद्यापासून सुरू
जळोचीतील जनावरांचा बाजार उद्यापासून सुरू

जळोचीतील जनावरांचा बाजार उद्यापासून सुरू

sakal_logo
By

बारामती : लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेला जळोची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारातील जनावरे बाजार येत्या गुरुवारपासून (ता. २९) जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार पुन्हा सुरु होणार आहे. बाजार समितीचे प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी ही माहिती दिली.
दर गुरुवारी जळोची येथे जनावरे बाजार भरविला जातो, मात्र लम्पीच्या प्रादुर्भावामुळे हा बाजार बंद करण्यात आला होता. आता गुरुवारपासून पुन्हा नव्याने हा बाजार सुरु होणार आहे.
दरम्यान लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दिलेल्या सूचनांचे पालन करून जनावरे विक्रीस आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या बाजारात जनावरे आणताना ती निरोगी असल्याची खात्री करूनच आणावीत, जनावरांना लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण केलेले असावे, कानात टॅग नंबर असावा, विहित नमुन्यातील आरोग्य दाखला सोबत आणणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.