देशात सर्वत्र सत्तेचा गैरवापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशात सर्वत्र सत्तेचा गैरवापर
देशात सर्वत्र सत्तेचा गैरवापर

देशात सर्वत्र सत्तेचा गैरवापर

sakal_logo
By

बारामती, ता. ३१ : ‘‘सत्तेचा गैरवापर देशात सर्वत्र होत आहे, हे वारंवार दिसत आहे. आजपर्यंत असे कधी पाहिले नव्हते. सत्ताधारी पक्षाने संसदेचा दर्जा कायम राखण्यासाठी पावले टाकले पाहिजे, मात्र असे होताना दिसत नाही.’’ असे म्हणत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘विरोधकांना बोलू द्यायचच नाही, सभागृहात गोंधळ करायचा आणि त्या गोंधळातच विधेयक मंजूर करून घ्यायची, अशी सरकारची भूमिका असल्याचे चित्र समोर येत आहे. हे असे किती दिवस चालणार हे समजत नाही. आता मात्र या सर्वांचा विचार आम्हा सर्व विरोधकांना एकत्र बसून करावा लागेल,’’ अशा शब्दात त्यांनी आगामी रणनीतीबाबत सुतोवाच केले.
अनिल देशमुख यांच्या बाबतीत पवार म्हणाले, ‘‘अनिल देशमुख, संजय राऊत यांना जामीनावर मुक्त करण्यात आले. न्यायालयाने त्यात भूमिका घेतली. फक्त विरोधकांना घाबरवून सोडण्याचे काम यातून झाल्याचे दिसते आहे. करण्यात आलेल्या अटकेच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर होत असल्याचे चित्र पुढे येत आहे.’’

सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून समोर यायला पाहिजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करायला हवे.
शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री