अनुसूचित शेतकऱ्यांना कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुसूचित शेतकऱ्यांना कृषी 
स्वावलंबन योजनेचा लाभ
अनुसूचित शेतकऱ्यांना कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ

अनुसूचित शेतकऱ्यांना कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ

sakal_logo
By

बारामती, ता. ९ : तालुक्यातील अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी अनिल बागल व सहायक गटविकास अधिकारी नंदन जरांडे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षासाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रीया शासनाच्या संगणकीय प्रणालीद्वारे सुरु झाली आहे. www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थीला पूर्व नोंदणी करून लाभाची बाब निवडून अर्ज करायचा आहे.

योजनांबाबत अधिकची माहिती
- लाभार्थ्यांची उत्पन्न दीड लाखांच्या आत असणे तसेच त्यांच्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांच्या नावावर किमान ०.४० हेक्टर आर. इतके क्षेत्र आवश्यक असून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेद्वारे सुरक्षित घोषित पाणलोट मधील ग्रामपंचायत क्षेत्रात विहिरीचा लाभ देय आहे. या साठी अडीच लाख रुपये अनुदान अटी व शर्तीनुसार देय आहे.
- जुनी विहीर दुरुस्तीच्या बाबत खासगी विहिरीसाठी लाभ देय आहे. या पूर्वी शासकीय योजनेतून विहिरीचा लाभ घेतलेल्या लाभार्थीस लाभ देय नाही. अटी व शर्तीनुसार याला पन्नास हजारांचे अनुदान देय आहे.
- प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या पात्र लाभार्थी यांना पूरक अनुदान देय आहे.
- दहा अश्वशक्ती पर्यंत इलेक्ट्रीक मोटार खरेदीसाठी वीस हजार अनुदान देय आहे.
- लाभार्थी शेतकऱ्याने वीज जोडणीसाठी भरलेली अनामत रक्कम त्याला यात परत केली जाते.