Thur, Feb 9, 2023

विनयभंगप्रकरणी
कारावासाची शिक्षा
विनयभंगप्रकरणी कारावासाची शिक्षा
Published on : 12 January 2023, 2:19 am
बारामती, ता. १२ : महिलेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या मूळच्या नेपाळी असलेल्या हरीश बिरा भट या युवकास येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. व्ही. पाटील यांनी सहा महिने सश्रम कारावास व सात हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
बारामतीत संबंधित महिला मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना तिचा पाठलाग करण्यासह हावभाव करून खुणवण्याचा प्रकार संबंधित युवकाकडून होत होता. कामाच्या ठिकाणीही तो पाठलाग करीत असे. ही बाब महिलेने पतीस सांगितल्यानंतर त्याचा नाव व पत्ता शोधून काढला होता. त्याने सातत्याने पाठलाग सुरुच ठेवल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी दाखल खटल्यात सरकारी वकील राहुल सोनवणे यांनी चार साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने त्याला सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.