सम्यक छाजेड

सम्यक छाजेड

जलसंधारण चळवळीत सहभाग
सम्यक यांचे पणजोबा खुशालभाऊ छाजेड हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, माजी नगरसेवक होते. तसेच, अनेक सामाजिक, धार्मिक संघटनेशी त्यांचे निकटचे संबंध होते. त्यांचे आजोबा किशोरकुमार छाजेड हेही अनेक सामाजिक व धार्मिक संघटनेशी संलग्न होते. त्यांचे वडील आनंद छाजेड हे भारतीय जैन संघटनेच्या बारामती शाखेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. सम्यक यांच्यावर कुटुंबीयांचे संस्कार झालेले असल्याने तेही विविध सामाजिक, धार्मिक व विधायक उपक्रमांत सक्रिय सहभागी असतात. शांतिलाल मुथा यांनी बारामती तालुक्यात जलसंधारणाची चळवळ हाती घेतली होती, त्यातही सम्यक यांनी भरीव योगदान दिले आहे.

सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न
सम्यक छाजेड यांनी ‘त्योहार’ या ब्रँडच्या माध्यमातून जॅकेट, सूट, जोधपुरी, शेरवानी यांचे उत्पादन करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास प्रारंभ केला आहे. स्वतः उत्पादनात असल्याने या सर्व कपड्यांची किंमत वाजवी राहते व दर्जेदार माल ग्राहकांना मिळतो. बदलती फॅशन व डिझाईन यांचा विचार करून ही उत्पादने होत असल्याने ग्राहकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भविष्यामध्ये विविध उत्पादनांमध्येही ते काम करणार आहेत. आपल्या दुकानात शहरी व ग्रामीण भागातील दोन्ही ग्राहकांना अद्ययावत तंत्रज्ञान वापरून सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न सम्यक यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com