बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाची बाजी
बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाची बाजी

बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाची बाजी

sakal_logo
By

बारामती, ता. २३ : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम येथे आंतरजिल्हा १४ व १६ वर्षाखालील मिश्र क्रिकेट स्पर्धेमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा प्रथम सामना बारामती येथील सारा क्रिकेट अॅकॅडमी बरोबर खेळला गेला त्यामध्ये कारभारी जिमखाना संघाने २४४ धावांचे आव्हान सारा क्रिकेट अॅकॅडमी समोर ठेवले. साईराज शेलार व आर्य कुमावत यांच्या भेदक गोलंदाजीमुळे सारा क्रिकेट अॅकॅडमीचा संघ फक्त ५९ धावात गारद झाला.
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा दुसरा सामना आर.एन. भिगवण क्रिकेट संघाबरोबर झाला. आर्य कुमावत व पार्थ शिंदे यांच्या गोलंदाजीसमोर आर.एन. भिगवण क्रिकेट संघ ३८ धावात बाद झाला. कारभारी जिमखाना संघाने फक्त ३ षटकांत हा सामना जिंकला.
अंतिम सामना हा कारभारी जिमखाना क्रिकेट संघ व डि.जे. क्रिकेट अॅकॅडमी यांच्यामध्ये झाला. त्यामध्ये साईराज शेलार,
विश्वजित जगताप, पार्थ शिंदे यांच्या भेदक गोलंदाजी समोर डि.जे. क्रिकेट अॅकॅडमी संघास फक्त ८७ धावा करता आल्या. प्रतिउत्तरादाखल सार्थक ढमढेरेच्या (४२ धावा) तडाखेबंद फलंदाजीमुळे केवळ सदरचा सामना कारभारी जिमखाना संघाने एकहाती केवळ १३ षटकांमध्ये जिंकत आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेच्या करंडकावर आपले नाव कोरले.
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला सचिन माने, इम्रान पठाण यांचे मार्गदर्शन मिळाले. नितीन सामल, विनोद यादव, संजय हाडके, प्रशांत नाना सातव यांनी संघाचे अभिनंदन केले.

06831