गोरख तावरे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरख तावरे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार
गोरख तावरे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार

गोरख तावरे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार

sakal_logo
By

बारामती, ता. २८ : येथील श्री छत्रपती शाहू कॉलेजमधील विज्ञान विषयाचे शिक्षक गोरख मनोहर तावरे यांना
महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाला आहे.

सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्याहस्ते शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षण आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, प्रधान सचिव रणजितसिंग देवोल, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान केला.

गोरख तावरे २३ वर्षापासून विज्ञान विषयाचे अध्यापन करीत आहेत. ते एक उपक्रमशील शिक्षक असून तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवार्डमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच ते स्वतः शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत सहभागी झाले आहेत.

समन्वय समिती सदस्य सदाशिव सातव, प्राचार्य बी.एन. पवार, उपप्राचार्य श्री पी.एन. तरंगे व जी.आर. तावरे, पर्यंवेक्षक बी.आर. सुतार, यांनी त्यांचे अभिनंदन केले.