बारामती येथे तारांगण युवामहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती येथे तारांगण युवामहोत्सव
बारामती येथे तारांगण युवामहोत्सव

बारामती येथे तारांगण युवामहोत्सव

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : विद्या प्रतिष्ठानच्यावतीने तारांगण या युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये शुक्रवार (ता. ३) व शनिवारी (ता. ४) दोन दिवस युवकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त सुनेत्रा पवार, किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी याबाबत माहिती दिली. युवकांनी युवकांसाठी आयोजित केलेला असे या उपक्रमाचे वैशिष्टय असून या युवा-महोत्सवाची पूर्ण आखणी आणि नियोजन हे संस्थेच्या महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची समिती करणार आहे.

या महोत्सवामध्ये बारामती, माळेगाव, शारदानगर, सोमेश्वर, भिगवण, इंदापूर, दौड, कळंब, सुपे, पुरंदर येथील विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या युवामहोत्सवात ३ मार्च रोजी शॉर्ट फिल्म मेकिंग, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, ऑन द स्पॉट पोस्टर मेकिंग, टेक्निकल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, कोडेथॉन आणि डान्स कॉम्पिटिशन अशा स्पर्धा आणि संध्याकाळी रॅप, म्युझिक कॉन्सर्ट, मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, चांडाळ चौकडीचा परफॉर्मन्स आणी फ्रेस्को फॅशन शो असे कार्यक्रम होणार आहेत.

शनिवार (ता. ४) गदिमा सभागृहात निवडक विद्यार्थी शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. युवा महोत्सवाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार असून विरोधी पक्षनेते अजित पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.