
विद्या प्रतिष्ठानच्या १३ विद्यार्थ्यांची आयटी कंपनीत निवड
बारामती, ता. ४ : येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची थॉटपॅड इन्फोटेक प्रा. लि.. या कंपनीमध्ये निवड झाली आहे.
थॉटपॅड इन्फोटेक ही आयटी क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. कंपनीचे सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, सोशल मार्केटिंग अशा विविध विषयांवर काम चालू आहे.
कंपनीने २०० विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली. त्यामध्ये महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची निवड केली. कंपनीतर्फे शिरीष कादबाने, शुभम वाघ, अतुल शिंदे, प्रदीप नाळे आदी उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, गजानन जोशी, महेश पवार आदी उपस्थित होते.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार योगेंद्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.