बारामती येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन
बारामती येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन

बारामती येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन

sakal_logo
By

बारामती, ता. ९ : येथील विद्या प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महिला दिनानिमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. यात धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, खो-खो या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्राचार्या डॉ. संगीता गायकवाड, डॉ. कल्याणी खानवलकर यांनी स्पर्धांचे उद्‍घाटन केले. वर्षा काळे, मेघना दराडे, टिळेकर यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. या स्पर्धेमध्ये शिक्षिका, विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.