बारामतीत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
बारामतीत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

बारामतीत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

बारामती, ता. ९ : तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बारामतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. १०) कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे शिवप्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होणार असून संध्याकाळी पाच वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातून निघणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे व नियोजनप्रमुख हेमंत नवसारी यांनी दिली. या मिरवणुकीमध्ये उंट, घोडे, पारंपरिक नृत्य, ढोल ताशा, लाठी काठी यांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.

दरम्यान महावीर पथ येथील राजे ग्रुपच्यावतीने रणमर्द शिलेदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रणमर्द शिलेदार हा कोल्हापूर येथील युवकांचा एक गट असून ते मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यामध्ये ३५ मावळे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती अध्यक्ष साई पवार, उपाध्यक्ष यश ढवाण, कार्याध्यक्ष ओंकार देशमाने, सचिव ऋषिकेश पाठक, खजिनदार फैजान आतार, प्रसिद्धिप्रमुख राज पाचंगे यांनी दिली.

छत्रपती जन्मोत्सव समितीच्यावतीने भक्ती, शक्ती संगम हा संतवाणी व छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गाणी असलेला कार्यक्रम गायक, अभिनेता फत्तेशिकस्त, पावनखिंड व शेर शिवराज है मधील अवधूत गांधी आळंदीकर सादर करणार आहे. शुक्रवारी (ता. १०) संध्याकाळी सहा वाजता चिराग गार्डन येथे हा कार्यक्रम होणार आहे.