''व्हीआयआयटी''मधील विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''व्हीआयआयटी''मधील विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड
''व्हीआयआयटी''मधील विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

''व्हीआयआयटी''मधील विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

sakal_logo
By

बारामती, ता. ९ : येथील विद्या प्रतिष्ठान इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील (व्हीआयआयटी) विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षण व इंटर्नशिपसाठी निवड झाल्याची माहिती संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी महाविद्यालयातर्फे वर्षभर विविध ट्रेनिंग प्रोग्रॅम्सचे आयोजन केले जाते. महाविद्यालयातील एमसीए विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये ऑन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस ड्राईव्हद्वारे ट्रेनिंग व इंटरनशिपसाठी निवड झाली आहे. शुभम शितोळे, अंजली अहिरेकर, भाग्यश्री कुलकर्णी, वैष्णवी तावरे, मोहित कारंडे, वैष्णवी बोरा, ओमकार राय, मोनीषा अरूमूगम (क्यू स्पायडर) मोनिका काळे (एक्सेल आर) ऋतुजा इंगळे, मेघा कदम (३डब्ल्यूडी सॉफ्टवेअर), गौरी भोसले (प्रिक्स कॉर्पोरेशन) यांची निवड झाली.

येत्या काळात महाविद्यालयात विद्यार्थीभिमुख अनेक उपक्रम प्लेसमेंट विभागाच्या वतीने राबवले जातील, अशी माहिती प्लेसमेंट समन्वयक राकेश कुलकर्णी यांनी दिली. यासाठी विद्याप्रतिष्ठानचा केंद्रीय प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभाग सर्व महाविद्यालयांना ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आणि प्लेसमेंट प्रभावीपणे राबवण्यासाठी सतत मदत आणि मार्गदर्शन करत असतो, असे विशाल कोरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड.अशोक प्रभुणे, सचिव अॅड.नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी अभिनंदन केले.