बारामतीत सुनील सस्ते यांचा सन्मान

बारामतीत सुनील सस्ते यांचा सन्मान

बारामती, ता. १३ : शहरातील बुरुड गल्ली ‌येथील पांडकर वाड्यामध्ये पेव्हर ब्लॉकचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल माजी नगरसेवक सुनील सस्ते यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अशोक पांडकर यांच्या हस्ते सस्ते यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नगरपरिषदेचे ठेकेदार पवार यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सस्ते यांनी नगरपरिषदेमध्ये पाठपुरावा करून काम करून घेतले. त्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या या सत्काराने वेगळे समाधान मिळाले, याने काम करण्यास उत्साह मिळतो, असे सस्ते यांनी सांगितले.
सत्कारप्रसंगी शाकीर बागवान, अतुल भागवत, विकास गुळवे, योगेश पांडकर, आशिष गुळवे, प्रकाश रत्नपारखी, धन्यकुमार पांडकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विवेक पांडकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com